गिरीश आंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते स्व.अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ सावनेर शहर,तालुका आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कमिटी तसेच महिला पदाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली समारंभ आयोजित करण्यात आला.
हा संभारंभ सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या कृष्णा कॉम्प्लेक्स कार्यालयात सायंकाळी ६ वाजता सुरू करण्यात आला.या सभारंभास गोपाल घटे,प्रशांत ठाकरे, आशिष माटे, सन्नी पारवे, रोशन वानखडे, सुरेंद्र वानखेडे, विकास चावरे, योगेश्वर वाडबुध्दे, तुषार गायकवाड, मोहन कानफाडे, राजु वाघाडे, सुभाष शेंबेकर, दिलावर शेख, विजय रडके, भगवान रायकवाड, सोनबा ठाकरे, भोजराज घटे, कान्हा घटे, अमोल डाहाट, अस्मिता ठाकरे, शीतल माटे, यामिनी मंडपे, जयश्री गायकवाड, वैशाली घटे, गणपती पठाणे, शामीम कुरेशी, मुन्ना पलेरिया, राजु तपासे, शांताराम अंतुरकर, वामन चांदे, शेखर कावडकर आणि किशोर कावडकर आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या समारंभात सर्व उपस्थितांनी स्व.अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Home महाराष्ट्र सावनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या)कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली...



