Home सामाजिक 19 एप्रिलला कळमेश्वर येथे कर्करोग निदान व उपचार शिबीर – आमदार डॉ...

19 एप्रिलला कळमेश्वर येथे कर्करोग निदान व उपचार शिबीर – आमदार डॉ आशिष देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान

35
0

कळमेश्वर
आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या सौजन्याने कर्करोग निदान व उपचार शिबीर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. हे शिबीर शनिवार, दिनांक 19 एप्रिलला सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे संपन्न होईल.
तंबाखू, गुटखा, धूम्रपानाचे व्यसन, तोंडात लाल-पांढरे चट्टे, तोंड उघडण्यास त्रास, शरीरावर गाठी, पोटदुखी, छातीदुखी असलेल्या लोकांना तसेच स्तनामध्ये दुखणे, ओटीपोटात दुखणे, अनियमित पाळी, श्वेतप्रदर असल्यास महिलांना या शिबिरात तपासणी व निदान चाचणी करता येईल. कर्करोगाशी संबंधित इतर लक्षणे असलेल्या लोकांनासुद्धा या शिबिराचा लाभ घेता येईल.
या शिबिरात कर्करोगाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांना देखील आपली तपासणी करता येईल. कोणत्याही प्रकारच्या आजारावर निःशुल्क उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी या शिबिरात नोंदणी व तपासणी करणे गरजेचे आहे.
शिबिरातील गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात येणार आहे.
या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तसेच तरुणांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान सुद्धा करावे, असे आवाहन शिबिराचे आयोजक आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here