सावनेरमध्ये आरोग्य सुविधा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. पण आता चित्र बदललंय.
कारण विकास म्हणजे फक्त घोषणा नाही, तर कृतीतून केलेली तयारी! हे ब्रीदवाक्य करत, डॉ. आशिषराव देशमुख यांनी या भागाच्या गरजा ओळखून तातडीने पुढाकार घेतला आणि त्याचं फलित म्हणजे सावनेरमध्ये १० कोटी ८५ लाखांचं आधुनिक ट्रॉमा सेंटर उभं राहतंय.
त्या मधे ICU, ऑपरेशन थिएटर, C.T. स्कॅन, एक्स-रे, पॅथोलॉजी, विशेष महिला वॉर्ड आणि यासाठी लागणाऱ्या स्टाफ, डॉक्टर, सुविधा यांचं नियोजन जवळपास पूर्ण झालं असून सध्या ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालंय आणि लवकरच ही सेवा सावनेरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख तुमच्या प्रश्नांसाठी, तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध.




