Home Breaking News सोशल मीडियावर देशाची सुरक्षा व पंतप्रधानाविषयी आक्षेपार्य पोस्ट केल्याने पोलिसांत तक्रार ...

सोशल मीडियावर देशाची सुरक्षा व पंतप्रधानाविषयी आक्षेपार्य पोस्ट केल्याने पोलिसांत तक्रार – भाजप कार्यकर्ते आक्रमक, मौदा येथील प्रकार

94
0

मौदा (तातुका प्रतिनिधी) : देशात युद्धजन्य परिस्थिती असताना सुद्धा काही दीड शहाणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर अकलेचे तारे तोडण्यास मागे पुढे पहात नाही. असाच प्रकार मौदा येथे घडला आहे. मौदा येथील एका खाजगी कंपनीत काम करणारा कामगार संजय कानतोडे यांनी दि. ९ मे रोजी येथील ‘बेस्ट फ्रेंड नामक व्हाट्सअप’ ग्रुपवर सवयीप्रमाणे देशाच्या जाबाज सैनिका बाबत व देशाच्या पंतप्रधानाविषयी आक्षेपार्य पोस्ट केल्याने याच ग्रुप वर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी संजय कानतोडे च्या विरोधात मौदा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्याशी चर्चा करून संजय कानतोडे ला अटक करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संजय कानतोडे यांनी यापूर्वी सुध्दा अनेकवेळा हिंदू धर्मातील देवी देवतांवर, जाती वाचक, राज्याचे मुख्यमंत्रीविषयी, देशाच्या पंतप्रधानाविषयी व सुरक्षे बाबतीत आक्षेपार्य पोस्ट फारवर्ड केल्या असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच ग्रुप ॲडमिन सुद्धा बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांना सुद्धा समज देण्याची मागणी केली आहे.वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांनी आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here