Home Breaking News नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल आयपीएस अनिल मस्के यांचा...

नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल आयपीएस अनिल मस्के यांचा आदिवासी पारधी समाजाकडून सत्कार

90
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल आयपीएस अनिल मस्के यांचा आदिवासी पारधी समाजाचे आदिवासी सेवक बबन गोरामन, प्रदेश युवा अध्यक्ष अतिश पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पवार, राहुल राजपूत आदी शिष्टमंडळाने दिनांक 21 जुलै 2025 रोजी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक सत्कार केला. आयपीएस अनिल मस्के यांच्या कर्तृत्वाने आणि कर्तव्यनिष्ठेने समाजाला नेहमीच प्रेरणा मिळत आहे.असे उद्गार यावेळी आदिवासी पारधी समाजाच्या शिष्टमंडळांनी काढले आहेत.
विशेष म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयपीएस अनिल मस्के यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांनी क्रांतिकारी समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रेत सहभाग घेऊन अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडवून आणला असून, अनेक मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here