गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
इंडिया लाईव्ह तेज न्यूज मध्ये दिनांक 18 जुलै 2025 रोजी “युरीया व डि.ए.पी खत गायब झाल्याने शेतकरी चिंतेत ? तर अधिकृत खत विक्रेते मात्र मालामाल ?” या मथळ्याखाली न्युज प्रकाशित केली होती.
त्यात ” कळमेश्वर सावनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २५ जून २०२५ नंतर कापूस,तुर,सोयाबीन,ज्वारी अशा पिकाची लागवड व पेरणी केली असून आधीच पावसाच्या कमतरता मुळे पिके वाढ न झाल्याने संकटात आली आहेत.
तर आता एक वेगळच संकट दोन्ही तालुक्यातील अधिकृत खत विक्रेतेच्यामुळे शेतकऱ्याच्या दाराशी पहायला मिळत आहे. पहिल्यांदाच पिकाला पाहिजेल ते खत देणे सुद्धा कठीण झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर शासन कडून शेतकऱ्याला पाहिजेल त्या खताची उपलब्धता केले असल्याचे अधिकृत खत विक्रेत्याकडील स्टॉक मध्ये पहायला मिळत आहे.
परंतु एवढे सगळे असुन दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्याला युरीया व डी.ए.पी अशा अनेक खताची कमतरता का भासत आहे. या खतांची मुबलक अशी उपलब्धता असून सुद्धा शेतकऱ्याच्या दारात संकट का ?
तर दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशांमध्ये युरीया ३२०,३५० ते ४०० रुपये प्रति हिशोबांनी तर त्याचप्रमाणे इतर खते सुद्धा अवैधरित्या विक्री झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.तर याकडे कळमेश्वर व सावनेर येथील कृषी विभागाद्वारे कोणती कारवाई करण्यात येणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत ? ” अशी न्युज लावून धरली होती आणि ती न्यूज माहिती करिता कळमेश्वर व सावनेर येथील कृषी विभागाला सुद्धा पाठवलेली होती. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुणतंत्र अधिकारी यांच्याकडे माहिती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आली होते.
त्यात सावनेर कृषी विभागाकडून तालुक्यात 40 अधिकृत विक्रेत्याकडे 3611 बोरी डीएपी शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली तर सावनेर तालुक्यात युरिया 71 अधिकृत विक्रेत्याकडे 31265 बोरी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभाग सावनेर येथील गुण नियंत्रण अधिकारी मोरेश्वर बावणे यांनी आज दिनांक 21 जुलै 2025 रोजी दिली आहे.
तर कळमेश्वर तालुक्यात कोण कोणत्या अधिकृत विक्रेत्याकडे किती बोरी युरिया व डीएपी शिल्लक आहे.याची माहिती घेण्याकरीता कृषी विभाग कळमेश्वर येथील गुण नियंत्रण अधिकारी प्रशांत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता दिनांक 18 जुलै 2025 रोजी सुरुवातीला माहिती दिली की,कळमेश्वर तालुक्यात डीएपी व युरिया ची कमतरता नाही याची मी प्रत्यक्ष माहिती घेतली आहे तसेच तालुक्यात असलेल्या कोण कोणत्या खत विक्रेत्याकडे डीएपी व युरिया शिल्लक आहे याची माहिती पुढील हप्त्यात देतो.पण त्या संदर्भात मला आज कृषी विभाग कळमेश्वर येथील तंत्र अधिकारी युवराज सेवतकर यांनी संपर्क करून माहिती दिली की तुम्हाला डीएपी व युरिया संदर्भातील माहिती पाहिजेल आहे तर कळमेश्वर येथील कार्यालयात सुरुवातीला रीतसर अर्ज करा नंतर तुम्हाला माहिती देतो.
तर परत आज गुण नियंत्रण अधिकारी प्रशांत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ” त्यांनी माहिती दिली की, मी कृषी विभाग तंत्र अधिकारी सेवतकर यांच्यासोबत बोललो असून मला सांगितली की तुम्हाला जी माहिती पाहिजेल त्याचा सुरुवातीला रीतसर अर्ज करायला लावा नंतर माहिती देतो.” ही माहिती दिली आहे.
तर कृषी विभाग सावनेर येथील कृषी अधिकारी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रण अधिकारी मोरेश्वर बावणे यांनी तात्काळ कारवाई करत अधिकृत विक्रेत्यांचे अवैध रित्या सुरू असलेल्या विक्रीस आळा घातला आहे.तर कृषी विभाग कळमेश्वर तंत्र अधिकारी युवराज सेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रण अधिकारी प्रशांत राऊत यांनी कळमेश्वर तालुक्यातील झालेल्या अधिकृत खत विक्रेत्याची “पाठराखण” केली असल्याची पाहायला मिळत आहे ?




