गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक २१ जून २०२५ रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ॲलोपॅथीक दवाखाना तेलकामठी येथे सकाळी १० वाजता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या योग शिबिराला ग्रामपंचायत तेलकामठी च्या सरपंच सौ प्रेमाताई डफरे, ऍलोपॅथीक दवाखाना तेलकामठी येथील डॉ पराग घाटोळे,राजेंद्र पगारे, पंकज बंड,योग शिक्षीका संदिपा मसाळकर,अविनाश तेलगोटे,संतोष तिवारी,धांडोळे सर,मोहिनी डाखोळे,चंदा कलसे,आशाताई,अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




