Home Breaking News प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी – आमदार डॉ आशिषराव देशमुख

प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी – आमदार डॉ आशिषराव देशमुख

113
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर येथे भव्य योग दिनाचे आयोजन “एक पृथ्वी – एक आरोग्य” या वैश्विक विचाराला अनुसरून 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन शिवाजी चौक, कळमेश्वर येथे अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. हा योग दिन अरविंद सहकारी बँक लिमिटेड, कळमेश्वर शाखा यांच्या सौजन्याने आणि सावनेर-कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.
शेतकरी बांधव, महिला, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, सकाळच्या प्रसन्न वातावरणात योगाभ्यास आणि सर्वत्र आरोग्यविषयक जागरूकतेची सकारात्मक ऊर्जा यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लक्षात राहणारा ठरला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अरविंद सहकारी बँक लि., कळमेश्वर शाखेचे विशेष योगदान राहिले. आरोग्य, सामाजिक जाणीव आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवण्याच्या दृष्टीने संस्थेची सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे.
“प्रत्येक नागरिकांचे आरोग्य निरोगी व स्वस्थ ठेवण्यासाठी सर्वांना योग व प्राणायामची आवश्यकता आहे. योग साधनेमुळे नागरिक निरोगी जीवन जगत आहेत. शेतकरी, मजूर, अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, विद्यार्थी व समस्त नागरिकांचे निरोगी शरीर व दीर्घ आयुष्याकरिता दैनंदिन जीवनात योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. योग साधनेमुळे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांनासुद्धा तणावमुक्त व निरोगी जीवन जगता येईल. कळमेश्वर येथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा करण्यात आला. येथे आयोजित केलेला हा भव्य योग दिवस मी सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील जनतेला समर्पित करीत आहे”, असे प्रतिपादन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. अशा उपक्रमांतून लोकांपर्यंत आरोग्याचे आणि सकारात्मकतेचे बळ पोहोचवण्याचे कार्य भविष्यातही अधिक व्यापकपणे सुरू राहील असेही ते म्हणाले.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार, संदीप उपाध्य, प्रमोद हत्ती, प्रतीक कोल्हे, गटविकास अधिकारी कळमेश्वर अंशुजा गराटे, तहसीलदार कळमेश्वर रोशन मकवाने, मनीषा लंगडे, धनराज देवके, मंगेशजी कोठाडे, मुकेश पराडे, रंजना देशमुख, राजू जयंत, कौशिक सर तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here