Home Breaking News राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी शताब्दी जयंती उत्साहात साजरी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी शताब्दी जयंती उत्साहात साजरी

54
0

सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 31 मे 2025 रोज शनिवारी दुपारी 12 .30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी शताब्दी जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष तथा नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक बाबा टेकाडे होते .प्रमुख अतिथी म्हणून सावनेर वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड.चंद्रशेखर बरेठीया ,जय शिवाजी सामाजीक संस्थेचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष दिनेश इंगोले, टेभुरडोह ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनोद नस्कोल,हत्तीसरा ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश भाकरे ,हत्तीसरा ग्रामपंचायतच्या सदस्या रंजना टेकाडे आदी मान्यवर मंचकावर उपस्थितीत होते .
सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चा व पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले .यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .
अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक बाबा टेकाडे यांनी आजच्या नेत्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनाचा आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी अल्पवयीन काळात मोठी जबाबदारी स्वीकारली.संकटावर मात केली.अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्या काळात झाला.विशेष म्हणजे त्यांनी जनतेला 12 फळाचे वृक्ष वाटप केले.यापैकी 7 वृक्षाच्या फळा पासून मिळणाऱ्या उत्पन्नात कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा आणि 5 वृक्षाच्या फळांचे उत्पन्न शासनाला कर म्हणून द्यायचे होते .हे 7 आणि 5 एकूण 12 वृक्ष म्हणजे आजचा महसूल विभागाचा 7/12 होय असे आवर्जून सांगितले.अन्य मान्यवरानी सुध्दा आपले विचार मांडले.संचालन मिननाथ बोबडे यांनी केले तर वासुदेव बोदे यांनी आभार मानले .
या प्रसंगी यशवंत पाटील,प्रभाकर डहाके,शुभम ढवळे,विनोद नस्कोल,कमल झडाने,नारायण बोबडे,रामेश्वर चाके,भगवान तवले,दौलत डहाके,हिरालाल आगरकर,विशाल गुडधे,चंद्रकांत टेकाडे,प्रशांत बोदे,शरद टेकाडे,सुरेंद्र लाखे आदीसह सावनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here