गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राची आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारण व आढावा सभा पार पडली. या आढावा सभेत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कुठले पाणी टंचाईचे प्रश्न उद्भवत आहेत, कुठले कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, गावात पाणीटंचाईचा प्रश्न मिटवण्यासाठी काय उपाययोजना राबवता येतील याबाबतचा सविस्तर आढावा या बैठकीदरम्यान माननीय आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी घेतला आणि लवकरात लवकर या प्रश्नावरती तोडगा काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सावनेर श्री.संपत खलाटे सह तालुक्यातील संपूर्ण अधिकारी व डॉ.राजीव पोतदार,मनोहर कुंभारे आणि बीजेपीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.




