Home पंचायत विभाग शासकीय भूखंडावरील अतिक्रमण बुधला ग्रामपंचायत सदस्याने गमावले पद

शासकीय भूखंडावरील अतिक्रमण बुधला ग्रामपंचायत सदस्याने गमावले पद

91
0

बुधला येथील प्रकार:सदस्य पदावरून अपात्रतेचा अप्पर जिल्हाधिकार्यांचा आदेश
कळमेश्वर: तालुक्यातील बुधला ग्रामपंचायतीचे सदस्य कोठीराम भाऊराव बोन्सुले यांनी शासकीय भूखंडावरील अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांना सदस्य पदावरून अपात्र करण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी माननीय तुषार ठोंबरे यांनी दिले.
या संबंधी तक्रार सुरेखा विनोद नेहारे यांनी अधिवक्ता भोजराज धंडाळे यांचे मार्फत माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाखल केली होती.या प्रकरणात अर्जदार सुरेखा विनोद नेहारे,गैरअर्जदार कोठीराम भाऊराव बोंसुले , ग्रामसचिव व तलाठी बुधला यांनी अतिक्रमणसंबंधाने दस्तऐवज व त्यांचे लेखी युक्तिवाद आदींचे माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात सादर करण्यात आले.त्यात कोठीराम भाऊराव बोंसुले यांनी ग्रामपंचायत आबादी भूखंड क्र.26 वर कोणतीही शासकीय परवानगी न घेता अतिक्रमण करून वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाले.
माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी सर्व परिस्थिती व युक्तिवाद तसेच कागदपत्रांचे अवलोकन करून ग्रामपंचायत सदस्य कोठीराम भाऊराव बोंसुले यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४-१(ज-३) अंतर्गत दोषी आढळून येत असल्याचा निष्कर्ष काढत कोठीराम भाऊराव बोंसूले हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहे असा निकाल दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here