Home पंचायत विभाग नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार ?

नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार ?

150
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
तालुक्यातील गट ग्रामपंचायत नांदीखेडा (तिष्टी खु) गावामध्ये कित्येक दिवसांपासून पाणी टंचाई सुरू असून उन्हाळ्याला नुकतीच आताच्या सुरुवात झाली आहे.परंतु ग्रामपंचायतच्या विकास कामाच्या ठरावांमध्ये अजून पर्यंत पाणीटंचाई विषयी चर्चा करण्यात आलेली नाही. तसेच याविषयी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत चर्चा करून विकासाचा आराखडा सरपंच व ग्रामसेवक धोटे यांनी करून घेणे गरजेचे होते पण त्यांनी गावाची पाणीटंचाईची समस्या जशीच्या तशी ठेवली आहे.तर आता वेळेवर पाणीटंचाईसाठी उपाय शोधत गावालगतील शेतकरी विठोबा बनसुले यांच्या शेतातील बोर अधिग्रहण करून पाणी घेतले आहे परंतु त्या बोर मधील पाणी आधी शेतकरी ओलतो व ओलीतकेल्यानंतर फक्त १ तास गावातील पाणीपुरवठा करता पाणी देतो परंतु त्यांनी पाण्याची टाकी सुद्धा भरत नाही तर गावातील नागरिकांना पाणी पिण्याला सुद्धा मिळत नाही. करिता आज दिनांक.२१मार्च२०२५ रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकरी व ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक धोटे यांना निवेदन देऊन पाणी टंचाईवर तात्काळ निराकारण करण्यासाठी 15वा वित्त आयोगाच्या निधीतून पानी टंचाईच्या कामासाठी प्रस्ताव मंजुर करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सदस्य मनोज मांडवगडे,चक्कधर जीवतोडे,सौ. दुर्गाताई प्रेमराज नेहारे यांचेकडून करण्यात आली आहे.
तर कळमेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांच्या मूलभूत समस्या जसेच्या तसे असून अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व सरपंच तसेच काही जवळीक लोकांच्या मनमर्जीने कारभार चालत आहे.अशा प्रकारचे अनेक समस्या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये समोर येत असून या समस्यांना वारंवार कळमेश्वर पंचायत समिती अंतर्गत येऊ नये अशा कुठल्याही उपाययोजना गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी जेव्हापासून कळमेश्वर पंचायत समिती येथे कारभार स्वीकारला तेव्हापासून केलेल्या पाहायला मिळत नाही ? तर आता नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत येथील पाणीटंचाई समस्येवर कशाप्रकारे निराकरण कळमेश्वर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी अंशुजा गराटे करतात याकडे अनेक गावातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here