आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या समस्यांचे निवेदन वन मंत्र्यांना दिले. सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली गेली होती. वन्य प्राण्यांच्या संदर्भात मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी मा. वन मंत्री व संबंधित अधिकारी यांचे समवेत दिनांक 19 मार्च 2025 ला मुंबई विधानभवन येथे बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये आमदार डॉ आशिष देशमुख यांनी सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामधील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या समस्या व वन्यप्राण्यामुळे होणारे नुकसान या बाबत सखोल मुद्दे संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमोर मांडले. त्यामध्ये वन्यप्राणी शेतीचे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान करतात. त्याबाबत वन पीक विमा मिळावा, शेतकरी अहोरात्र मेहनत करून देशाची खरी सेवा करतो. त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान हे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात करतात. त्याचा पंचनामा सरळ वनविभागाकडून व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये रेंजरचा फोटो अत्यावश्यक आहे. अनेकदा वाघासारखे वन्य प्राणी जंगल सोडून गावात, शेतामध्ये वावरतात त्यामुळे शेतीचे नुकसान, सोबतच कित्येकदा मनुष्यहानी पण होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यासाठी त्या वन्य प्राण्यांना पकडन्यासाठी पिंजरा उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे डुक्कर या वन्य प्राण्याची पैदास खुप मोठ्या प्रमाणात होते. ते शेतीचे खूप मोठया प्रमाणात नुकसान करतात. यावर विशेष लक्ष देणे गरजेचं आहे, तसेच जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना जाळीचे कुंपण योजनेअंतर्गत मंजूर करून मिळावेत, अशा अनेक प्रकारच्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या समस्या आमदार डॉ आशिष देशमुख यांनी बैठकीमध्ये मांडल्या. या बैठकीमध्ये अनेक विधानसभा सदस्य व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.