Home कृषी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांनी केले ?

शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांनी केले ?

130
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यात फेब्रुवारी व मार्च २०२४ रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतीपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले होते. बाधित झालेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. माहिती ई-पंचनामा पोर्टलवर मंजूर झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी ‘महा-आयटी’ यांच्याकडून विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करावयाचा असल्याने आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून नुकसानभरपाई अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.ज्या लाभार्थ्यांची यादी ई- पंचनामा पोर्टलवर मंजूर झालेली आहे, त्यांची विशिष्ट क्रमांक यादी(व्हीके लिस्ट) ग्रामपंचायत स्तरावर, तसेच तलाठी कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सेतू केंद्र व आपले सरकार केंद्रावर विशिष्ट क्रमांक यादी पुरविण्यात आली आहे.ही यादी साझ्यातील संबंधित ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे. बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अद्यापही बऱ्याच बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास वेळ लागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण अद्यापही केले नाही, त्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे,असे आवाहन तहसीलदार रोशन मकवाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here