सावनेर
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सावनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने सावनेर पंचायत समिती कार्यालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर,कृषी महाविद्यालय नागपूर येथील सहायक प्रा. खोब्रागडे, खपनवाडे हे उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, अशोक धोटे, देवीदास मदनकर, मंदार मंगळे, रोहित मुसळे, दिगांबर तुरतकर, प्रमोद पिंपळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले. संचालन उप कृषी अधिकारी रोशन डंभारे यांनी केले. आभार कविता काटेखाये यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी कार्यालयातील हरिश्वर मानकर,युवराज पवार,पूजा इंगळे, मीनल वैद्य,विद्या बिराजदार,मंगला वाघमारे,योगिनी ढोले, वैष्णवी महाल्ले,नानू चोपकर,प्रज्वल मेंढे,कृष्णा धोटे,अरविंद वानखेडे,सुरेखा शंखे आदी उपस्थित होते.




