(काटोल तालुका प्रतिनिधी)
दिनांक १२/११/२०२५ रोजी पोलीस स्टेशन काटोल चे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी अंमलदार यांना गुप्तबातमीदारकडुन खात्रीशिर माहीती प्राप्त झाली की, आरोपी नामे १) वैभव प्रकाश कावडकर रा. रामदेवाबाबा ले आउट काटोल ता काटोल जि नागपुर आणि २) रवेश ज्ञानेश्वर पवार, रा. सारवाही ता. कारंजा जि वर्धा यांनी अनेक मोटर सायकल चोरीचे गुन्हे केले आहे. आरोपी वैभव प्रकाश कावडकर रा. काटोल हा तळयाची पार काटोल येथे येत असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाल्याने काटोल पोलीसांनी तळयाची पार काटोल येथे सापळा रचुन आरोपी वैभव प्रकाश कावडकर याला एक मोटर सायकल घेवुन येत असतांना ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याला त्याचे कडे असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करून सदर मो.सा ची माहीती काढली असता सदर मो.सा चोरीचा गुन्हा पोलीस स्टेशन कोंढाळी येथे नोंद असल्याचे समजले. सदर आरोपी ला अटक करून त्याचे कडे सखोल चौकशी करत दिनांक १४/११/२०२५ रोजी पोलीसांनी त्याचा साथीदार रवेश ज्ञानेश्वर पवार, वय २६ वर्षे, रा. सारवाडी, ता. कारंजा जि वर्धा याला नारा फाटा, कारंजा जि वर्धा येथुन ताब्यात घेवुन अटक केली. काटोल पोलीसांनी कौशल्यपुर्ण तपास करीत मोटर सायकल चोरीचे २० गुन्हे उघडकीस आणले. त्यापैकी १५ गुन्हे पोलीस स्टेशन काटोल येथे दाखल आहे. ३ गुन्हे पोलीस स्टेशन नरखेड येथे दाखल आहे. १ गुन्हा पोलीस स्टेशन कोंढाळी येथे दाखल आहे. तसेच १ गुन्हा पोलीस स्टेशन वाडी, नागपुर शहर येथे दाखल आहे. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन १८ मोटर सायकल किंमती ४,९७,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २ मोटर सायकल पोलीस स्टेशन आर्वी जि. वर्धा येथे जप्त आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन नमुद दोन्ही आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे.




