गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवारी सकाळी ११वाजता नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात साथी पोर्टल संदर्भात कृषी निविष्ठा विक्री केंद्र संचालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय कळमेश्वर येथे करण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी शुभांगी पाटील, तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार,जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी मार्कंड खंडाईत, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक प्रशांत राऊत,मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुरडकर तसेच कळमेश्वर तालुका कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे अध्यक्ष मनोज निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील मोठ्या संख्येने कृषी सेवा केंद्र संचालकांनी सहभाग नोंदविला.
तज्ञ मार्गदर्शक म्हणून शुभांगी पाटील यांनी साथी पोर्टलचे व्यवस्थापन, त्याचा प्रत्यक्ष वापर आणि हाताळणीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पोर्टलच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रांना होणारे फायदे आणि शेतकरी बांधवांना दिली जाणारी सुविधा याविषयीही माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन आणि यशस्वी पार पडण्यासाठी उप कृषी अधिकारी उज्वल डाखोडे, युवराज सेवतकर तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पवन दुपारी यांनी विशेष सहकार्य केले.




