Home Breaking News सावनेर पामकोर्ट लॉन येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या अध्यक्षतेत...

सावनेर पामकोर्ट लॉन येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषद संपन्न

51
0

सावनेर
केंद्र सरकारने नुकतेच नवीन जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर केले. खऱ्याअर्थाने हि देशाच्या अर्थव्यवस्थेला व सर्वसामान्यांना दिलासा देणारा कांतिकारी निर्णय ठरणार आहे. असे मत मनोहर कुंभारे भाजप जिल्हाध्यक्ष काटोल यांनी सावनेर येथील पाम कोर्ट लॉन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मनोहर कुंभारे म्हणाले की, 2017 मध्ये केंद्र सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात लागू केली होती. त्यावेळी जीएसटी मध्ये 5 12 18 आणि 28 टक्के असे 4 स्लॅब ठेवण्यात आले होते. सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या स्लॅब मधील 12 आणि 28 टक्के हे स्लॅब कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अधिकांश वस्तूंसाठी केवळ 5 आणि 18 टक्के अशा दोन स्लॅब ठेवण्यात आले आहे. आता नवीन करप्रणाली मुळे वस्तू व सेवांमध्ये वर्गीकरण करणे सोपे होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
2017 मध्ये लागू झालेला जीएसटी हा धाडसी पण गुंतागुंतीचा टप्पा होता. या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा ही आवश्यक कोर्स करेक्शन ठरेल हे निश्चित, जो भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेईल. ही सुधारणा केवळ कर-सुलभीकरणापुरती मर्यादित न राहता भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणारी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेल्या नवीन जीएसटी सुधारणांच्या अनुषंगाने होणारे परिणाम हे सर्वसामान्यांना आर्थिक संजीवनीच ठरणार आहे. नवीन जीएसटी सुधारणा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहेत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवरील करदर कमी झाल्यामुळे स्वयंपाक घरातील खर्च कमी होईल. तूप, पनीर, दुग्ध पदार्थ, साबण, शॅम्पू यांसारख्या आवश्यक वस्तू आता अधिक स्वस्त मिळणार असल्याने सर्वसामान्यांच्या जगण्याचा भार हलका होईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणा-या काही साहित्य व उपकरणांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्याची संधी उपलब्ध होईल. वस्तू स्वस्त झाल्यामुळे बाजारात मागणी वाढेल आणि विक्रीत वाढ होऊन शेतीमालालाही चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे. या सुधारणा ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांच्या खिशाला दिलासा देणार्या ठरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व मध्यमवगीय लोकांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकार वर विश्वास अजून ठाम झाला असल्याचे ते म्हणाले, पत्रकार परिषद आटोपल्यांनतर पाम कोर्ट लॉन येथे पं. दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी धनरामजी देवके,आदर्श पटले, जिल्हा महामंत्री रामराव मोवाडे, दिनेश ठाकरे, जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा समन्वयक उज्वला बोढारे, जिल्हा अध्यक्ष आघाडी, मंदार मंगळे सावनेर मंडळ अध्यक्ष, आयुषी धपके, सोनु नवधिंगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तसेच सहसंयोजक जीएसटी, प्रतिक कोल्हे मंडळ अध्यक्ष कळमेश्वर, राजू घुगल, तुषार उमाटे, राजू भुजाडे, महेश चकोल, पिंटू सातपुते, ईत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here