29 मे 2025 रोजी लोकनेते माननीय रणजीतबाबू देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लता मंगेशकर हॉस्पिटल, काटोल येथे आयसीयू व हृदयरोग विभाग सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. हृदयरोग विभाग डॉ हितेंद्र भागवतकर डीएम (कार्डियलॉजी) यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन डॉ अनिरुद्ध देवके (वैद्यकीय अधीक्षक, लता मंगेशकर हॉस्पिटल, काटोल) यांच्या हस्ते आणि डॉ हितेंद्र भागवतकर, डॉ किशोर ढोबळे (इंटेन्सीव्हिस्ट) व डॉ रुपल दरक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयसीयू सेवासुद्धा काटोल वासियांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल, काटोल येथे सुरू करण्यात आल्या आहेत. श्री रणजीतबाबू देशमुख यांच्या वाढदिवसाप्रसंगी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आले होते. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी यावेळेस रक्तदान करून रणजीतबाबूंचा वाढदिवस साजरा केला. हृदयरोग विभाग, आयसीयू सेवा कार्यान्वित होणे हे काटोलवासियांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे वक्तव्य एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सजल मित्रा व डॉ अनिरुद्ध देवके यांनी केले आहे.
Home आरोग्य लोकनेते रणजीतबाबू देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लता मंगेशकर हॉस्पिटल,काटोल येथे आयसीयू...




