नागपूर :-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना ग्राहक हिताचे कार्यकर्ते करते, आमचा देव म्हणजे ग्राहक, तो लुटता कामा नये, या ग्राहक संघटनेत नुसते वळवळ नको तर एक चळवळ म्हणून काम करण्याचे आवाहन विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे यांनी केले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारणीच्या निर्देशानुसार अ.भा. ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा व महानगराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे कार्यक्रम बेसा, नागपूर येथील रेणुका महाविद्यालयात शुक्रवार दि. ११ जुलै रोजी पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री नितीन काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांत सचिव चारुदत्त चौधरी, प्रांत संघटनमंत्री अभय खेडकर, प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, प्रांत सहसचिव विलास ठोसर, व प्रांत कार्यकारी सदस्या डॉ. शोभा गायकवाड तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री नितीन काकडे, प्रांत सचिव चारुदत्त चौधरी व संघटनमंत्री अभय खेडकर यांनीही आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना जोश भरला.
प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे यांनी कार्यकारिणी घोषित केली यामध्ये नागपूर जिल्हाध्यक्ष पदी संजय साळवे, उपाध्यक्षपदी राजेश, दिवारे, मधूकर पोटे, सचिवपदी प्रभाकर शिवणकर, सहसचिव पांडुरंग काळे, नरेश चौधरी, कोषाध्यक्ष सतीश मारवी, कार्यालय प्रमुख रमेश जोशी, महिला प्रमुख संध्या पुनियाणी, सहप्रमुख शारदा आनोडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख नामदेव आमनेरकर, पर्यावरण आयाम प्रमुख प्रदिप रिंगरे,आईटी सेल प्रमुख अविनाश बागडदे, विधी आयाम प्रमुख ॲड. केतन भोस्कर, रोजगार सृजन रमेश चिंचोणे, मार्गदर्शक विलास भोस्कर, कार्यकारिणी सदस्य देवेंद्र सोनटक्के, प्रकाश कोरडे, चंद्रशेखर वांढरे, ईश्वर बरबारे, घनश्याम रहाटे, अजय काठोरे, केशव पानतावणे, योगीता बैतूले, नरेश उराडे, प्रकाश क्षिरसागर आदिंचा समावेश आहे.
त्याचप्रमाणें नागपूर महानगर कार्यकारिणी मध्ये नगराध्यक्षपदी शरद जिचकार, उपाध्यक्ष विजय वाडिभस्मे, सचिव राजू पुसदेकर, सहसचिव कठारे, विनोद चरपे, कोषाध्यक्ष विभाकर नांदे, महिला प्रमुख अंजू घोलावे, महिला सहप्रमुख संध्या कुरवे, रोजगार सृजन प्रमुख प्रा. राम शेगळे, विधी आयाम प्रमुख ॲड. प्रियेश आंगेकर कार्यकारिणी सदस्य जयश्री लोहकरे रविंद्र जिभकाटे, अरुण काटे, नरेश चौधरी, उषा देव, अनिल मेहरे, चंद्रशेखर चरडे, विष्णू हजारे, रामभाऊ कोतापल्लीवार, प्रा. कल्पना पारधी आदिंचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत सहसचिव विलास ठोसर यांनी, सुत्रसंचलन राजेंद्र दिवारे यांनी तर आभारप्रदर्शन संजय साळवे यांनी केले. नवनियुक्त अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले.




