Home Breaking News केसरनाला तलावात देवी विसर्जनादरम्यान शोकांतिका : शेषराव सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू

केसरनाला तलावात देवी विसर्जनादरम्यान शोकांतिका : शेषराव सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू

155
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तेलकामठी येथील केसरनाला तलावात देवी विसर्जन सोहळ्यादरम्यान दुर्दैवी घटना घडली असून, शेषराव शामराव सोनवणे (वय 44) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी गावातील नागरिक देवी विसर्जनासाठी तलावावर गेले होते. विसर्जनावेळी शेषराव सोनवणे हे पाण्यात उतरले असता अचानक तोल गेल्याने ते बुडाले. ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्थानिकांकडून समजते.
त्यामुळे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या दुर्घटनेबाबत माहिती मिळतात सावनेर पोलिसांनी व हितज्योती आधार फाउंडेशन ने अधिक तपास सुरू केला आहे. देवी विसर्जनाचा आनंद शोकात बदलल्याने तेलकामठी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here