सावनेर
दिनांक 14 जुलै 2025 रोजी 12 वाजता संभाजी ब्रिगेड चे नेते मा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे 13 जुलै 2025 रोजी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यपालांना उपविभागीय अधिकारी संपत खलाटे सावनेर यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड, जय शिवाजी सामाजिक संस्था मराठा सेवा संघ असे अनेक संघटनेच्या वतीने एकत्रित पणे निवेदन देण्यात आले आहेत.
त्यामधील दोन प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे करण्यात आले आहेत.
1) शिवधर्म फाउंडेशनचा कार्यकर्ता दीपक काटे याच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी तसेच शिवधर्म फाउंडेशन संघटनेची मान्यता रद्दकरून संघटनेवर कायम स्वरूपी बंदी घालण्याबाबत.
2) मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस हे राज्यात कायदा व सुरक्षा राबविण्यात अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचा राजीनामा घेण्याबाबत.
सन 2014 पासून राज्यात भाजपचे सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य बदनाम करण्याचे कट कारस्थान त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून त्याला जमिनदोस्त करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणे.फुले,शाहु, आंबेडकर यांचा विचार प्रामाणीकपणे सांगणाऱ्या विचारवंतांना संपवण्यासाठी समाज कंटकांना पाठबळ देऊन त्यांची पाठराखण करणे. महापुरूषांची बदनामी करणाऱ्या लोकांना संरक्षण देणे. कोशियारी, छिंदम, सोलापुरकर, कोरटकर सारख्या अनेक समाज कंटकांना आर्थीक व शासकिय पाठबळ देवून त्यांचे संरक्षण करणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणविस हे या पदाला न्याय देवू न शकल्याने महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग झालेला असा आरोप अनेक सामाजिक संघटनेने सावनेर येथे केला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड,जय शिवाजी सामाजिक संस्था मराठा सेवा संघ व अनेक सामाजिक संघटनाचे दिनेश इंगोले.ॲड.गुजाजी बरडे,कांचन ढवंगाळे,प्रशांत ठाकरे,गजू कोमुजवार,रमेश वानखेडे,पवन लांबट,शकील झेडिया,विक्रम गमे,विनोद मानकर,गणपती पठाने,योगेश खुरपुडे,सेवकराम राऊत,अनिल घटे,संदीप भोंगाडे, मयूर नागदवणे,संजय राऊत,दादाराव लांजेवार,संजय टेंभेकर,नीलिमा बाळापुरे,प्रणाली धोटे,भगवान चांदेकर,भीम रत्न लोखंडे,श्याम घोरमारे,राजीव सोनटक्के,सागर बोरसे,विवेक मालेकार,अभय मोहतकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Breaking News संभाजी ब्रिगेड चे नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन...




