गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज शुक्रवार दिनांक ६ जून २०२५ रोजी सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांनी गोंडखैरी येथील लॉजिस्टिक पार्कमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वेअरहाऊस व गोदामांची पाहणी केली. त्यानंतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, शासन स्तरावर आवश्यक सुविधा पुरविण्यासंदर्भात त्यांना आश्वस्त केले.
या वेळी संघटनेतील सदस्यांनी पाणीपुरवठा व विजेच्या समस्यांची माहिती आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण मदत केली जाईल, असे आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांनी त्यांना सांगितले.
या प्रसंगी आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या समवेत श्री.बाबर अन्सारी, श्री. आशिष दुधे, श्री. विजय राजे, श्री. जगदीश थेटे, श्री. सुधाम बांबल आणि श्री. प्रसाद ठक्कर यांचीही विशेष उपस्थिती होती.


