सावनेर :- पतंजलिच्या मिहान-सेझ येथील आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड हर्बल पार्कमध्ये दि. ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ज्यूस युनिट’चे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पतंजली समूहाचे प्रमुख रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण उपस्थित राहणार आहेत.
दि.१० सप्टेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता.
२३० एकरांवर पसरलेल्या या प्लांटमध्ये जगातील सर्वात मोठे संत्र्याचा रस काढण्याचे युनिट असणार आहे पतंजलि समूहाचा हरिद्वार प्लांट पेक्षाही मोठा प्लांट ठरणार आहे.
यासंबंधीची पतंजलि योग समिती, महिला योग समिती, भारत स्वभिमान,युवा भारत, पतंजलि किसान सेवा समितीची दि. ३ मार्च रोजी नियोजित बैठक भारत स्वाभिमान मुख्य केंद्रिय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर मिहान येथे पार पडली.
यावेळी पतंजलिचे डॉ. जयदीप आर्य, स्वामी आदित्यदेव महाराज, स्वामी ऋतूदेव महाराज, यशपाल आर्य व अनेक तालुका प्रभारी उपस्थित होते.


