सावनेर
सावनेर (तिष्टी)–काटोल मुख्य मार्गावरील सावंगी ते तेलकामठी गावांदरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती.
सदर रस्त्याचा वापर दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्ग करीत असल्याने प्रवास अत्यंत धोकादायक बनला होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांना वारंवार अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत तेलकामठी येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश आंदे यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.
सदर मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिक, वाहनचालक व प्रवाशांनी या कामामुळे दिलासा व्यक्त केला असून सामाजिक कार्यकर्ते गिरीश आंदे यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे.
Home Breaking News सावंगी ते तेलकामठी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांची अखेर दुरुस्ती – सामाजिक कार्यकर्ते गिरीश...




