Home Breaking News मंगसा येथील पांधनची आम आदमी पार्टीकडून करण्यात आली पाहणी कामात भ्रष्टाचार झाल्याचे...

मंगसा येथील पांधनची आम आदमी पार्टीकडून करण्यात आली पाहणी कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप – शेतकऱ्यांचा आवाज बुलंद !

78
0

सावनेर-पांढुर्णा हायवेवरील पोलिस चौकीजवळील मंगसा गावाकडे जाणाऱ्या पाधन रस्त्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. या महत्त्वाच्या पांधनातून जवळपास ४०० एकर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी जात असतानाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत “आम आदमी पार्टी”चे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे, जिल्हा संघटनमंत्री संजय राऊत, जिल्हा महासचिव जामुवंत वारकरी आणि शहर अध्यक्ष गजुभाऊ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पांधनाची सखोल पाहणी केली.
या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पांधनात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. मात्र काही अपुऱ्या व संशयास्पद कामांमुळे पांधन पूर्णतः बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी वाया जात असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.”ही पांधन केवळ शेतीसाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या भविष्याशी निगडीत आहे. यामधील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ठोस कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here