नाशिक राजस्थानच्या गुलाबी नगरीत पार पडलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या बॅट आणि बॉलच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व राजस्थान टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत, महाराष्ट्राने १४ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील अशा दोन्ही वयोगटांत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
त्यामध्ये 14 वर्षातील प्रथम क्रमांक महाराष्ट्र
द्वितीय क्रमांक उत्तर प्रदेश,तृतीय क्रमांक मुंबई तसेच 19 वर्षातील प्रथम क्रमांक महाराष्ट्र,द्वितीय क्रमांक मुंबई,तृतीय क्रमांक महाराष्ट्रB यांनी मिळवला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुज्जर तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव सौ मीनाक्षी गिरी ,महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, इत्यादी उपस्थित होते.
या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदवला टेनिस क्रिकेट स्पर्धेचा 14 वर्षात आतील अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश(यूपी) असा झाला. यामध्ये महाराष्ट्र च्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी करत विजेतेपद मिळवले. उत्तर प्रदेश(यूपी) संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तृतीय क्रमांक मुंबई यांनी मिळाला तसेच 19 वर्षातील अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा झाला यामध्ये महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळ करत विजयश्री मिळवला तसेच मुंबई संघाला उपविजयी पदावर समाधान मानावे लागले तृतीय क्रमांक महाराष्ट्र बी संघाला मिळाला.
या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू याची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे . आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा या डिसेंबर महिन्यामध्ये नेपाळ येथे होणार आहे .
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील वैयक्तिक पुरस्कार: मॅन ऑफ द सिरीज – मानस राजपूत,बेस्ट बॉलर – लंबोदर निकम बेस्ट बॅट्समन – मानस राजपूत व19 वर्षांखालील वैयक्तिक पुरस्कार:
मॅन ऑफ द सिरीज – रोहन दाबले,बेस्ट बॉलर – रोहन दाबले,बेस्ट बॅट्समन – तरुण (राजस्थान) मिळाल्याबद्दल
आणि महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुज्जर व भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या महासचिव मीनाक्षी गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी ,चंद्रकांत तोरणे महाराष्ट्र सहसचिव, दर्शन थोरात नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड धनंजय लोखंडे या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्राने एकूण 5 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. विशेष म्हणजे, खूप वर्षांनंतर 19 वर्षांखालील मुलांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी महाराष्ट्रासाठी जिंकून आणली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
या यशामागे सर्व खेळाडूंची मेहनत, जिल्हा सचिवांचे सहकार्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पंचांचे उत्कृष्ट योगदान आहे. विशेषतः
मानस पाटील, धनश्री गिरी, सोमा बिरादार, महेंद्र देशमुख आणि स्वप्निल सुर्वे यांनी मार्गदर्शन व पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली, त्यामुळेच आज महाराष्ट्राला हा सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला.
हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. खेळाडूंची मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.”
— महाराष्ट्र टेनिस क्रिकेट परिवार
Home Breaking News राजस्थानमध्ये महाराष्ट्राचा ‘कडक’ धमाका! राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत दुहेरी सुवर्णवेध




