Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

सावनेरमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

52
0

सावनेर
“ऐसा चाहूँ राज में, जहाँ मिले सबन को अन्न, छोटो-बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न” या समतेचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) सावनेर येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
नगर परिषद सभागृह, सावनेर येथे आयोजित या कार्यक्रमास सकाळपासूनच रविदास भक्तांची मोठी उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता नगर परिषद हॉल, गडकरी चौक ते आंबेडकर चौक दरम्यान भव्य शोभायात्रा (रॅली) काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व जयघोषात निघालेल्या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दुपारी ३ वाजता नगर परिषद सभागृहात प्रबोधन व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आशिष देशमुख (आमदार, सावनेर विधानसभा क्षेत्र) होते.प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर कुंभारे (माजी जि.प. उपाध्यक्ष), रामराव मोवाडे (नागपूर जिल्हा ग्रामीण सचिव, भाजपा) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंदार मंगळे (नगराध्यक्षा, नगर परिषद सावनेर) यांच्या हस्ते झाले.यावेळी उत्तम कापसे (जिल्हाध्यक्ष, शिवसेना), राजु घुगल (नगरसेवक), तुषार उमाटे, सुभाष मछले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
विशेष अतिथी म्हणून मयूर नागदवणे (बी.पी.एस. संघ महानायक), योगेश सोनेकर (जिल्हाध्यक्ष, चर्मकार कमिटी पांढुर्णा), भगवान चांदेकर (अध्यक्ष, जनकल्याण सामाजिक संघटना) व ग्रामपंचायत अधिकारी श्यामराव डाम्बरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था, सावनेर यांच्या वतीने करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र छत्रे, उपाध्यक्ष अनूप पठाणे, सचिव राजेंद्र चवडे, कोषाध्यक्ष नित्यानंद कोलते, सहसचिव उमेश मछले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सल्लागार समितीतील राजु छत्रे, धनराज छत्रे, अशोक छत्रे, भगवान चांदिकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here