लोकरंग कलाश्रृंगार गृह सावनेर तर्फे दि. 28 सप्टेम्बर 2025 रोजी नवरात्री निमित्त लोकरंग गरबा उत्सव 2025 सांस्कृतिक कार्यक्रम 8वा पर्व चे सफल आयोजन बालाजी लॉन सावनेर येथे करण्यात आले ज्यामधे खुला गरबा स्पर्धा तसेच समूह गरबा स्पर्धांचा समावेश होता ज्यामधे अनेक महिला, बालक व पुरुषाँचा सुद्धा समावेश होता.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, माजी नगर सेवक राजु घुगल, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक यशपाल डाहाके , व्हॉईस ऑफ़ मीडिया जिल्हा अध्यक्ष पत्रकार दिलीप घोरमारे व तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पत्रकार राहुल सावजी तसेच सोशल मिडिया इंफ़्लूयेंसर सावनेर वाला वरुण खुरसुंगे व ट्रेंडिंग सावजी यांची उपस्तिथि लाभली.
तसेच विशेष प्रस्तुतिकार म्हणून प्रसिद्ध कथक नृत्य कलाकार गुरु कुशल भट्टचार्य ,शिवार लोककला समाजिक व संस्कृतिक संघ प्रसिद्ध लोकनृत्य व लोककला कलाकार सचिनजी दाभनेकर,रविंद्र राजुरकर,सतीश भूरसे तसेच प्रमुख पाहुने व परिक्षक म्हणून नृत्यअरंगम सेंटर ऑफ़ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक ऋषिकेश पोहनकर,पाश्चात्य नृत्य कलाकार व गरबा प्रशिक्षक रजत सोनुले. या सगळ्यांची उपस्तिथि लाभली.
यामधे विविध कलकारांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केले तसेच खुला गरबा व समूह गरबा स्पर्धा मधे अनेक कलाकारान्नी उत्कृष्ठ गरबा प्रस्तुती दिली तसेच कार्यक्रमात विशेष प्रस्तुति म्हणून नृत्यअरंगम सेंटर ऑफ़ परफॉर्मिंग आर्ट्स च्या परिनीता ठाकरे,आरोही जांगडे,केशवी पांडे,गार्गी पिसे,शामिली जांगड़े,कार्तिकी धोटे व पूर्णिमा वायकोले यांनी भारतनत्यम शास्त्रीय नृत्य शैलित अम्बा स्तुति प्रस्तुत केली.कुशल भट्टचार्य यांनी कथक नृत्य प्रकारात जगत जननी स्तुति व झपताल प्रस्तुत केले,
लोकरंग महिला कला मंच च्या नमिता इलमकर,संगीता डोंगरे,पायल सूर्यवंशी,कविता सूर्यवंशी,कामीनी माळेकर,ममता पवार,भारती जांगड़े,वैष्णवी परिहार यांनी तमिलनाडु राज्यातील कुम्मीअट्टम लोकनृत्य तसेच शिवार लोककला सामाजिक व सांस्कृतिक संस्था च्या हिमाक्षी गेडाम,एकता गुबे,संध्या बिसेन,स्नेहा सिदम,चेतना मंथनवार,सृष्टी विश्वकर्मा,भूमि जापुलकर,हिमानी चौधरी,पलक खंडाते,तृप्ति गणवीर,नीव मेश्राम यांनी गोवा राज्यातील पारंपरिक दीवली लोकनृत्य ची प्रस्तुति दिली.
सोबतच डांसिंग मिस्ट wcl गरबा ग्रुप,जगदंब गरबा ग्रुप व प्रारंभ गरबा ग्रुप यांनी समूह गरबा स्पर्धा मधे सहभाग घेऊन उत्तम प्रस्तुति दिली.
विशेष आकर्षक म्हणजे 2025 च्या लोकरंग कलाभूषण नृत्य आचार्य सन्मान या पुरस्काराने कोलकाता चे प्रसिद्ध कथक नृत्य कलाकार गुरु कुशल भट्टचार्य व शिवार लोककला सामाजिक व सांस्कृतिक संस्था नागपुर चे संचालक सचिन श्यामराव दाभनेकर यांना लोकरंग कलाश्रृंगार गृह टीम तसेच मान्यवरांद्वारे पुरस्कृत करण्यात आले.
सोबतच सर्व सहाभागींना व उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्शीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.ज्यामधे बेस्ट ट्रेडिशनल वेशभूषा,बेस्ट दांडिया प्लेयर,बेस्ट एनर्जी टिक गरबा प्लेयर,बेस्ट यूनिक ट्रेडिशनल लुक यांचा समावेश होता.विशेष प्रस्तुतीकारांना प्रमाणपत्र, भेटवस्तु व रोख बक्शीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे निवेदन हे भावा रिपोर्टर एकता भेलोंडे हिने केले.
आयोजन लोकरंग कलाश्रृंगार गृह च्या मीनाक्षी गजभिये,योगिता घोरमारे,सुवर्ना भगत व आकाश बरवड यांनी केले तसेच या कार्यक्रमाला नमिता इलमकर,संगीता डोंगरे,पायल सूर्यवंशी,कामीनी माडेकर,ममता पवार,भारती जांगड़े सोबतच नंदराज डेकोरेशन, राजुभाऊ वैद्य, ए आर फोटो स्टूडियो, दीपक राजगिरे, वैष्णवी परिहार,पूर्वा चौहान,अनिकेत ढाले,जनार्दन बरवड व चंदन बरवड या सर्वाँचे मौलाचे सहकार्य लाभले.
Home Breaking News लोकरंग कलाश्रृंगार गृह सावनेर तर्फे लोकरंग गरबा मोहोत्सव 2025 सांस्कृतिक कार्यक्रम 8...




