गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
मानव कल्याण बहुउद्देशीय बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या कळमेश्वर तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आज दि. 28 जुलै 2025 रोजी कळमेश्वर ते मोहपा रोडवर उबाळी गावाजवळ रोडच्या दुतर्फा वन झाडे लावून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र सातपुते सुरेंद्र बेलेकर सतीश कुबडे विशाल डेहरिया मनोज धोटे अनिल चवरे किशोर पाटील आदी सदस्य गण उपस्थित होते.




