निसर्गाच्या सानिध्यात खेळणे,बागडणे आणि नवीन गोष्टी शिकणे मुलांना आनंदित करतात यामुळे अनेक शाळा मुलांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करतात ज्यात मुले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा अनुभव घेतात.याच पार्श्वभूमीवर हुळकेश्वर नागपूर येथील फर्स्ट स्टेप फन स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी शहरी व शाळेच्या वातावरणातून बाहेर निघुन सहलीच्या किंवा क्षेत्र भेटीच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात खेळुन,बागडून आणि नवीन गोष्टी शिकता याव्यात.निसर्गाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने शाळेने सुट्टीच्या दिवशी केलेल्या नियोजनानुसार नुकतीच खेकडानाला जलप्रकल्पाला भेट दिली.
यादरम्यान विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देण्यात आली.जलस्त्रोतांचे महत्त्व येथील हिरवीगार वनराई विविध प्रकारचे प्राणी,पक्षी व जलाशयाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.याशिवाय सावनेर जवळील जी टी एन इंडस्ट्रीज नावाच्या सुती उद्योगाला भेट दिली.या परिसरातील बालउद्यानात मनसोक्त खेळून बागडून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत वनभोजनाचा आनंद लुटला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक हेमंत मिटकर, संचालिका नीता मिटकर,मुख्याध्यापिका ममता निमखेडकर,शिक्षिका वैशाली कोदंडे,रोशनी पगाडे,सुषमा तवने,रीता पसारे,सोनाली उपगडे,विना बोकडे,राणी कापसे, भारती निपुण,अर्चना चिखले,उर्वशी समुद्रे,राजश्री दुरणे, सपना भातकुळे,रूपाली घाडगे,स्नेहा दळदळे,जोशना पाढेकर,विद्या भलामी,चंद्रप्रकाश कापसे,किरण खापर्डे,कृष्णा शिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.




