(तालुका प्रतिनिधी मौदा )
राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मौदा तालुक्यात तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशान्वये (शासन निर्णय क्र. २) ही समिती गठीत करण्यात आली असून, तालुक्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विद्यापीठे, कौशल्य विकास केंद्रे येथे गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीतील सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्षपद तहसीलदार डी.आर. निंबाळकर यांच्याकडे असून, सदस म्हणून गटविकास अधिकारी महेश बेहेकर, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) सुनंदा बजाज, गटशिक्षण अधिकारी संकेत मरस्कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बाबुराव बालपांडे, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे प्राधिकृत संस्था प्रतिनिधी संदेश गणवीर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम, संत सुनील घुसान, क्रीडापटू विनोद निकुडे, साहित्यिक शिशुपाल डोंगरे, पत्रकार तुकाराम लुटे, गड संवर्धनकर्ते श्रीधर वडे, प्रफुल बरगटकर, उद्योजक प्रतिनिधी आशिष सतदेवे, महिला बचत गट प्रमुख गौरी वैद्य, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी दिनेश ढोबळे, बिलास पाथेर, जनार्दन माथुरकर, पुरुषोत्तम ढगे तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एन. कळंबे सचिव म्हणून काम पाहतील.
हा भव्य कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री गजानन मंगल कार्यालय, मौदा येथे आयोजित करण्यात आला आहे. समिती गठीत झाल्यानंतर पूर्व नियोजन बैठक दि.३१ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या दालनात यशस्वीपणे संपन्न झाली आहे. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Home Breaking News मौदा तालुक्यात ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त तालुकास्तरीय समिती स्थापन –...




