गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तेलकामठी जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्या राजकीय चर्चेला उधाण आले असून, नुकतेच भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मनोज मांडवगडे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे मांडवगडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देऊ शकतात, अशी चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
मांडवगडे हे भाजपात असताना पक्षाच्या मर्यादेपलीकडे जाऊन समाजसेवक म्हणून कार्यरत राहिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध समित्यांमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्षभेद न ठेवता सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल सर्व समाजघटकांनी घेतली असून त्यांनी सर्कलमध्ये एक सर्वसमावेशक नेतृत्व उभं केलं आहे.
भाजपातून बाहेर पडून तीन महिने झाले असले तरी आजही भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मांडवगडे यांच्याबद्दल आदर व आपुलकी कायम आहे. विशेष म्हणजे त्यांचे राजकारण काँग्रेसमधूनच सुरू झाले होते. सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाचे उपसरपंचपद भूषविले आहे. स्थानिक राजकीय कारणांमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता, मात्र त्यांचा पक्षाशी संबंध कायम राहिला.
स्थानिक पातळीवर, जर काँग्रेसने तेलकामठी पंचायत समिती सर्कलमधून मांडवगडे यांना उमेदवारी दिली, तर तेलकामठी जिल्हा परिषद सर्कल मध्ये काँग्रेसला मोठा फायदा होईल, असा सर्वसामान्यांचा अंदाज आहे. धनोज कुणबी समाजात प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून मांडवगडे यांची ठसठशीत ओळख निर्माण झाली आहे. जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम केले आहे.
Home Breaking News तेलकामठी पंचायत समिती सर्कलमध्ये काँग्रेसकडून मनोज मांडवगडे यांच्या उमेदवारीची चर्चा तीव्र —...




