गिरीश आंदे
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरोडा येथील मानकर आदर्श महाविद्यालय मध्ये ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
उद्घाटक म्हणून उद्योजिका व आकाश फर्निचरच्या एमडी व सीईओ शिल्पा अग्रवाल (मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७) उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी प्रिया रमेश मानकर यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. प्रत्येक महिलेचा मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सोहळ्यात डॉ. राजीव पोद्दार, माजी जि.प. सदस्य अरुणा मानकर, गीता दळवी, ज्योती कोहळे, किरण वंजारी, संगीताताई वासनिक, डॉ. राजश्री राऊत, मंगला शेटे, मनीषा पिंपळशेंडे उपस्थित होत्या. प्राचार्या जया मानकर यांनी प्रास्ताविक केले, प्रभा ठाकरे यांनी संचालन केले तर सुषमा नेहारे यांनी आभार मानले.




