Home जागरुकता कळमेश्वर तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांनी यूआयडी कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य – तहसीलदार...

कळमेश्वर तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांनी यूआयडी कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य – तहसीलदार विकास बिक्कड

80
0

गिरीश आंदे
महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना यूआयडी कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे, असे तहसीलदार विकास बिक्कड यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अनुदान १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२५ पासून ही रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जात आहे.
कळमेश्वर तालुक्यात सध्या ७८३ दिव्यांग लाभार्थी आहेत. सोयीसाठी तहसील प्रशासनाने तलाठी कार्यालय तसेच संजय गांधी योजना शाखा येथे लिपिक सुजाता दवणे यांच्याकडे यूआयडी व आधार कार्डची प्रत जमा करण्याची व्यवस्था केली आहे.
त्याचबरोबर, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत १७०४ लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईलसह हयात प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहावे, असेही विकास बिक्कड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here