महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कामाक्षी सेलिब्रेशन (घाटोडे परिवार) सावनेर यांच्या वतीने पांढुर्णा रोडवरील शिव मंदिर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाला भोलेनाथाच्या शेकडो भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्तीभाव, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमात मंदिर परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भाविकांसाठी केलेल्या महाप्रसाद वाटपामध्ये घाटोडे परिवाराने अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने सेवा दिली.
महाप्रसाद वाटपाची जबाबदारी रत्नमाला घाटोडे, मनोहर घाटोडे, अश्विनी पंकज घाटोडे, पंकज घाटोडे, डॉ. सुजाता पराग घाटोडे व डॉ. पराग घाटोडे यांनी समर्थपणे सांभाळली.
या सेवाकार्यात विजय डोंगरे, किशोर महंत, तनमय कडू तसेच इतर सहकाऱ्यांनीही मोलाची साथ देत घाटोडे परिवाराच्या सेवाभावी उपक्रमात हातभार लावला.
महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी आयोजित केलेला हा महाप्रसाद कार्यक्रम केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक एकोप्याचे आणि निस्वार्थ सेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. घाटोडे परिवाराच्या या उपक्रमाचे भाविकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, अशा सेवाभावी कार्यातूनच समाजात सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीची भावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Home Breaking News कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर चा महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा आणि सेवाभावाचा अनुपम संगम




