Home सांस्कृतिक व सामाजिक मांडवी येथे दोन दिवसीय शिवजयंती उत्सव थाटात साजरा

मांडवी येथे दोन दिवसीय शिवजयंती उत्सव थाटात साजरा

85
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील मांडवी गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. दोन दिवसीय शिवजयंती उत्सव विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.नयनाताई ठाकरे (अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, मुंबई-ठाणे) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख व्याख्याते म्हणून श्रद्धाताई नानवटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद दादा मानकर (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, नागपूर) होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे प्रथम नागरिक सरपंच शरद जुनघरे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि तरुण पिढीने त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक परिधि वाघे हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक वंश दिलीप ठोंबरे याने मिळवला. निबंध स्पर्धेत खुशाली दिलीप ठोंबरे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर अक्षरा टाकरखेडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत समीर वासुदेव ठोंबरे प्रथम तर सजल विनोद ढोके द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
या उत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक म्हणून शिवस्वराज्य मित्र मंडळ मांडवी चे मोलाची योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here