Home Breaking News कळमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तापली – मतदार चर्चेत...

कळमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तापली – मतदार चर्चेत रंगले

203
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
तालुक्यातील गावागावात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विविध गावांमध्ये मतदारांच्या मनात इच्छुक उमेदवारांबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त होत असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे तयार होऊ लागली आहेत. कळमेश्वर तालुक्यात आता गावागावात अनेक नावांची चर्चा होताना दिसत आहे.
तेलकामठी जिल्हा परिषद साठी सुमित्रा मनोहर कुंभारे, स्मिता युवराज हेलोंडे व सीमा संजय जिवतोडे हे भाजपाचे तर मंगला अभय फुटाणे,स्वाती प्रकाश निंबाळकर,मालती धनराज वसु,अमिता चंद्रशेखर धवड, प्राजक्ता वासुदेव निंबाळकर,प्रेमाताई सुरेश डफरे,व प्रगती श्रावण भिंगारे हि काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.
तेलकामठी पंचायत समितीमध्ये रुकेश देशमुख,संजय जीवतोडे,श्रावण मोहोड,स्वप्निल बावणे,वैभव टेकाडे,संदीप मोहोड व हरिदास खरबडे हे भाजपाचे तर धनराज वसु,अमोल देशमुख,मनोज मांडवगडे,सुरेश डफरे,महेंद्र देशमुख,आंनदराव गायधने, ऊमराव भुजाडे व मारोती केचे हे काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.तर सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेला विनोद मानकर हा नव्या चेहऱ्याच्या रूपात मतदारांच्या चर्चेत आहे.
कोहळी पंचायत समितीमध्ये प्रशांत मडावी,रूपराव भिंगारे, अमोल भुरे, संजय कुबडे व मिलिंद यावलकर हे भाजपाचे तर दादा भिंगारे, विजय ठाकरे,रितेश परवरकर व देवकांत वानखेडे हे काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.
धापेवाडा जिल्हा परिषद साठी संदिप उपाध्ये, मनोहर कुंभारे, दिलीप धोटे व गोविंदा शेट्टे हे भाजपाचे तर बाबा कोढे,वैभव घोंगे,महेंद्र डोंगरे,राजेंद्र जिचकार ही काँग्रेसची नावे चर्चेत आहेत .
धापेवाडा पंचायत समितीमध्ये प्रतिभा मडावी हे भाजपाचे तर विशाखा ईरपाची हे काँग्रेसची नावे चर्चेत आहे.
उबाडी पंचायत समितीमध्ये मंगेश चोरे व चंदू चंभारे हे भाजपाचे तर नरेंद्र पालटकर व अमोल फुलारे हे काँग्रेसचे आणि संजय चौधरी हा अपक्ष उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे.
गोंडखैरी जिल्हा परिषद साठी स्वाती शैलेंद्र आसोले व पल्लवी प्रमोद हत्ती हे भाजपाचे तर विभा निंबाळकर, कल्याणी सुधीर पोहनकर,नीता संजय तभाणे,रश्मी छत्रपती मोहोड हि काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.
गोंडखैरी पंचायत समितीमध्ये सुनंदा किशोर अतकरी व ज्योती अजय वाटकर हे भाजपाचे तर रीना उमेश कुबडे हि काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.
सेलू पंचायत समितीमध्ये अश्विनी मधुकर खांडेकर व प्रतिज्ञा धीरज मेश्राम हे भाजपाचे तर ताराबाई विजय भांगे व स्नेहा छत्रपती भुरभुरे हि काँग्रेसची नावे चर्चेत आहेत.
स्थानिक पातळीवर वाढते राजकीय तापमान तालुक्यातील सर्वच क्षेत्रांत राजकीय हालचालींना वेग आला असून, मतदार आता उमेदवारांच्या कार्यकौशल्याचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि सामाजिक कार्याचा आढावा घेत आहेत.
युवा नेतृत्व आणि अनुभवी कार्यकर्त्यांमधील स्पर्धेमुळे या निवडणुकीला विशेष रंग चढला आहे.स्थानिक राजकारणाचे समीकरणे कशी जुळतात,याकडे आता तालुक्यातील मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here