Home Breaking News शासकीय जागेवर अतिक्रमण प्रकरणी बुधला ग्रामपंचायत उपसरपंचासह सदस्य अपात्र – अपर जिल्हाधिकाऱ्याचां...

शासकीय जागेवर अतिक्रमण प्रकरणी बुधला ग्रामपंचायत उपसरपंचासह सदस्य अपात्र – अपर जिल्हाधिकाऱ्याचां निवाडा

56
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
ग्रामपंचायत च्या हद्दीतील शासकीय म्हणजेच रस्त्यावरच अतिक्रमण करून त्यावर घर बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्याने अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी बुधला (ता.कळमेश्वर) येथील उपसरपंच भूषण प्रल्हाद बहादुरे व राजेश सुखदेव सय्याम यांना ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरविले आहे. यासंदर्भात सुरेखा विनोद नेहारे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती.
उपसरपंच भूषण प्रल्हाद बहादुरे,सदस्य राजेश सुखदेव सय्याम यांनी शासकीय रस्त्यावरच घरे बांधून अतिक्रमण केल्याची तक्रार सुरेखा विनोद नेहारे यांनी अधिवक्ता भोजराज धंदाळे यांचेमार्फत १७ ऑगस्ट २०२३ रोजी अपर जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.या प्रकरणाची कळमेश्वर येथील तहसीलदारांच्या माध्यमातून चौकशी केली. उपसरपंच भूषण प्रल्हाद बहादुरे,सदस्य राजेश सुखदेव सय्याम यांनी सार्वजनिक रस्त्यावरच अतिक्रमण करून त्यावर घर बांधकाम केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी शुक्रवार दि. २० ऑगस्ट २०२५ ला प्रकरणाची अंतिम सुनावणी करून निवाडा दिला आहेत.
शासकीय रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर घरे बांधकाम केल्याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी उपसरपंच भूषण प्रल्हाद बहादुरे तर सदस्य राजेश सुखदेव सय्याम यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१)(ज-३) अन्वये उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here