Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा...

सावनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा – वृद्धाश्रमात सेवा उपक्रम

38
0

गिरीश आंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम, कळमेश्वर रोड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैशाली गोपाल घटे यांनी भूषविले, तर सावनेर-कळमेश्वर विधानसभा महिला अध्यक्षा यामिनी मंडपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात सावनेर शहर महिला अध्यक्षा शीतल माटे,स्मिता प्रशांत ठाकरे व सुनीता अशोक गायकवाड यांनी आपल्या भाषणातून आई जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, पी.टी. उषा, सानिया मिर्झा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांसारख्या महान महिलांचे उदाहरण देत नारी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी केक कापून वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना पोटभर जेवण, आईस्क्रीम तसेच भेटवस्तू देऊन सेवा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात नागपूर जिल्हा, सावनेर तालुका व शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले.
जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सावनेर-कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष बाबा झाडे यांनी वृद्धाश्रमातील प्रत्येक व्यक्तीस महाराष्ट्र शासनाकडून दरमहा 3000 रुपये मिळावेत, अशी मागणी व्यक्त केली.
तालुका अध्यक्ष सुरेंद्र वानखेडे व शहराध्यक्ष गोपाल घटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजू वाघाडे, युवक अध्यक्ष तुषार गायकवाड, अशोक गायकवाड, विजय रडके, मोहन कानफाडे, सोनबा ठाकरे, भगवान रायकवाड, आशीष माटे, सनी पारवे, रोशन वानखेडे, योगेश वालबुद्धे, सुभाष सेंबेकर, योगेश शर्मा, कविता कानफाडे तसेच अनेक महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here