Home क्रीडा रामटेक आणि पारशिवणी क्रीडा संकुलांचा होणार कायापालट; निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे...

रामटेक आणि पारशिवणी क्रीडा संकुलांचा होणार कायापालट; निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे निर्देश

2
0

राजु कापसे
रामटेक
आज दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली रामटेक / पारशिवणी क्रीडा संकुलाची बैठक तहसिल कार्यालयात घेण्यात आली.
रामटेक / पारशिवणी क्रीडा संकुलात खेळाडूंना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध क्रीडा विषयक सोयी-सुविधांची कामे तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी विलंब न करता तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी दिल्या. तसेच व्हॉलिबॉल व बास्केटबॉलसाठी स्वतंत्र, सुयोग्य मैदानांची निर्मिती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. रामटेक व पारशिवणी या ठिकाणच्या दोन्ही मैदानांना सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यात सक्षम क्रिडा संस्कृती निर्माण करण्यासाठी इकोसिस्टीम आभारण्यावर चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील खेळाडूंना सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. क्रीडा क्षेत्राततालुक्याचा दर्जा उंचावण्यासाठी आणि युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी नमूद केले. तसेच रामटेक व पारशिवणी येथील मैदानाची राज्यमंत्री जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रयेश महाजन, रामटेक तहसीलदार रमेश कोळपे, रामटेक नगर परिषद चे नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन,पारशिवनी तहसीलदार सुरेश वाघचौरे,मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी शिवराज पडोळे, प्रशांत सांगडे, मुख्याधिकारी रामटेक पल्लवी राऊत, मुख्याधिकारी पारशिवणी नितीन लुंगे,तालुका क्रीडा अधिकारी माया दुबळे, खोब्रागडे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पोकळे, प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक राजकुमार थोरात आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here