Home Breaking News भारताचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा युवक जागृती मंडळाचा निषेध; एसडीपीओ...

भारताचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा युवक जागृती मंडळाचा निषेध; एसडीपीओ व एसडीओ यांना निवेदन

36
0

सावनेर प्रतिनिधी –
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध करण्यासाठी युवक जागृती मंडळ व समता सैनिक दलाच्यावतीने संयुक्तरित्या निवेदन देण्यात आले. समाजसेवक सुधाकर बागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन एसडीओ संपत खलाटे व सहायक पोलिस अधीक्षक सागर खर्डे यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठविण्याची विनंती करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर एका वकिलाने केलेला हल्ला हा अत्यंत भ्याड प्रकार असून आंबेडकरी समाज याचा तीव्र निषेध करतो. सरन्यायाधीश दलित समाजातून आले असल्यामुळे हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे दलित समाजातील कलेक्टर, डॉक्टर आणि क्लास वन अधिकारी यांच्यावरही अशा प्रकारच्या हल्ल्यांची भीती निर्माण झाली आहे.
या सर्व अधिकार्‍यांना सुरक्षा पुरवावी आणि अशी घटना पुन्हा होऊ नये याची गंभीर दखल घ्यावी, तसेच सरन्यायाधीशांना पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याप्रमाणे सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, समाजसेवी सेवकदास सोमकुंवर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष विजय कापसे, भिमराव डंभारे, सिल्लोरी शाखा समता सैनिक दलाच्या अध्यक्षा रंजना गौरखेडे, अनुप गजभिये, शांताराम ढोके, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन लिडर, विठ्ठलदास जनबंधु, रोहिणी गौरकर, संगिता रामटेके, सरला बागडे, रविंद्र गजभिये, विक्की शेंडे तसेच युवक जागृती मंडळ, समता सैनिक दल व आंबेडकरवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here