गिरीश आंदे
नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर त्वरित निवारण करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान – टप्पा १’ अंतर्गत सभाजभवन तेलकामठी येथे समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २१८ प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सरपंच प्रेमा डफरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खोंडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार ज्योती जाधव, संजय कांबळे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.
शिबिरात फेरफार ३२, सातबारा दुरुस्ती ५, डिजिटल सातबारा ११८, डिजिटल आठ-अ ५८ व निराधार योजनेची ५ प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले. संचालन ज्योती जाधव यांनी केले, तर संजय कांबळे यांनी आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी शरद बोरकर, केशव कुटे,संजय पुसांडे, प्रवीण शंभरकर, हेमंत चिनोरकर तसेच तलाठी इरफान जानिवाले, रोहिणी रंगारी, नीता मेंघरे, निरंजना गणेर, रामनाथ आडे, प्रियंका काळे, अपूर्वा बन्सुले, क्रिष्टीना रफेल, अश्विनी वनारकर, सुझाता डाखोळे, आशिष बरडे आदींनी सहकार्य केले.




