सावनेर
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वा चारचाकी वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता,सावनेर पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड परिसरातील विविध ट्युशन वर्गांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व पटवून देण्यात आले, तसेच अपघात व कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी वाहन न चालविण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, १८ वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालविण्याची कायदेशीर परवानगी नसते आणि अशा प्रकारची कृती ही दंडनीय गुन्हा ठरते.
तसेच, ट्युशन वर्गांतील शिक्षकांनाही दररोज विद्यार्थ्यांना वाहन न आणण्यासंबंधी सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
ही मोहीम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बडदे, किशोर राठोड तसेच ट्रॅफिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.
या जनहित मोहीमेमुळे स्थानिक पातळीवर वाहतूक सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती घडून आली असून पालक व शिक्षकांनी देखील पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Home Breaking News सावनेर पोलिसांकडून ट्युशन वर्गांतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती – शिक्षकांना सहकार्याचे आवाहन




