गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
राज्य शासनाने AgriStack योजना सुरू केली आहे, जी आपल्या शेतीविषयक भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता सरकारच्या सर्व कृषी योजना – जसे की कर्जमाफी, पीकविमा, अनुदान व इतर योजना – यांचा लाभ घेण्यासाठी AgriStack कार्ड अनिवार्य असणार आहे.
या योजनेअंतर्गत आपल्या शेताची माहिती, पिकांची माहिती, भू-संदर्भ, आणि इतर कृषी संबंधित माहिती एकत्रित केली जात आहे. ही नोंदणी भविष्यातील सर्व योजनांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
परंतु, सध्या सावनेर तालुक्यात ५०% व कळमेश्वर तालुक्यात केवळ ५८% शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. ही नोंदणी १००% होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोणताही शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही.
त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझे आवाहन आहे – आजच आपल्या आणि आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याची AgriStack नोंदणी पूर्ण करा!
या प्रक्रियेसाठी आपल्या ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्या आणि तालुका प्रशासनाशी संपर्क साधा.
ही योजना तुमच्यासाठी आहे, पण नोंदणी झाल्याशिवाय लाभ मिळणार नाही.!
सतर्क राहा, पुढे या, आणि आपल्या हक्काचं स्थान सुरक्षित करा.
आपला,
आमदार.डॉ. आशिषराव देशमुख
(सावनेर–कळमेश्वर विधानसभा क्षेत्र)