Home Breaking News महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेरआणि सम्यक बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेरआणि सम्यक बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस पंचशील बौद्ध विहार येथे संपन्न

62
0

सावनेर
दि.८ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर आणि सम्यक बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील बौद्ध विहार येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरू शाळेच्या मुख्याध्यापिका कमल पावनकर मॅडम उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे उषा देशभ्रतार आणि वैशाली रामटेके मॅडम या सुद्धा मंचावर उपस्थित होत्या.
याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा अध्यक्ष मनीषा साखरे यांनी महिलांना आपल्या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि अंधश्रद्धा पसरू नये याविषयी महिलांना जागृत केले. त्याचप्रमाणे माधुरी बारमासे यांनी प्रभावी भाषणातून महिलांना स्त्री तत्वाचा बोध दिला.
कार्यक्रमाला उपस्थित उषा देशभ्रतार यांनी आपल्या जीवनातील संघर्षातून महिलांना मार्गदर्शन केले . त्याचप्रमाणे वैशाली रामटेके यांनी सुद्धा महिलांना आपल्या मार्गदर्शनातून प्रभावित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जवाहरलाल नेहरू शाळेच्या मुख्याध्यापिका कमल पावनकर मॅडम यांनी महिलांना वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्या जीवनात कसं यशस्वी होता येईल अशी उत्कृष्ट माहिती देऊन महिलांना जीवनाचा सार समजून सांगितला.
कार्यक्रमाचे संचालन लीना गजभिये यांनी केले तर आभार हे सुनिता सहारे यांनी केले. कार्यक्रमाला प्रिया देशभ्रतार, नलिनी बोंद्रे, रमा मेश्राम, सुरेखा गजभिये, तारा गजभिये, सरस्वती नारनवरे, संगीता हनवते, शांताबाई नानवटकर, कुसुम तागडे, कुसुम सोमकुवर, अनिता गोंडुळे, वनिता सोमकुवर, वैशाली लांजेवार, बेबीबाई लांजेवार, विशाखा गजभिये, ज्योती गजभिये, शारदा खांडेकर, सुनिता गोंडुळे, पार्वती पाटील अशा अनेक महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here