मौदा : –
आई-वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांची मुले चार दिवस आठवणीत ठेवतात. परंतु मुलांचा मृत्यू झाल्यावर आई-वडील मरेपर्यंत विसरत नाही. त्यासाठी प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडिलांची सेवा मनोभावे करावी. असे गौरव उद्गार हभप डॉ. त्र्यंबकेश्वर साठवणे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केले आहे. मौदा येथील कालीमाता नगरमध्ये धनजोडे परिवाराच्या वतीने माता-पिता, गुरु, बंधू यांच्या पुण्यस्मरण सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम वारकरी भागवत सप्ताहाचे आयोजन दि. ४ मार्च ते ११ मार्च पर्यंत करण्यात आले आहे.भागवत प्रवचनकार हभप विठ्ठलराव गवळी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भागवतांचे तिसऱ्या दिवशी हभप डॉ. त्र्यंबकेश्वर साठवणे महाराज यांचे किर्तन झाले, त्यावेळी ते आपल्या सुमधुर वाणीतून उपस्थित किर्तन प्रेमींना धार्मिक मार्गदर्शन करत होते. साठवणे महाराज पुढे म्हणाले तरुणांनी चार दिवसांच्या ओळखीने प्रेमात पडून खडतर आयुष्य जगण्यापेक्षा जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या मर्जीने विवाह केल्यास आनंदमय जिवण जगता येईल असेही तरुणांना किर्तनातून मार्गदर्शन केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांना साक्षी ठेवून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. भागवत कार्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक कल्पना अशोक धनजोडे, हर्षला देवराव धनजोडे, रंजना भाऊराव धनजोडे, तनुजा सुभाष धनजोडे, प्रियांका नितेश धनजोडे, हर्षदा चेतन धनजोडे व संपूर्ण धनजोडे परिवाराने केले आहे.




