मौदा
चांगले काम करणे म्हणजे केवळ मोठे कार्य करणे नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगले करतो, तेव्हा आपली एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे क्षेत्रिय संघटनमंत्री नितीन काकडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यात जनजागृती व्हावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा तालुक्याच्या वतीने तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री नितीन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १० ऑगस्ट रोजी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भंडारा येथील अ.भा.ग्राहक पंचायत चे जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा खेडकर, विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे, सरपंचा दुर्गा खांडेकर, उपसरपंच नामदेव ढोबळे, पोलीस पाटील श्रावण हटवार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पडोळे, कल्पना बावनकुळे, अ.भा. ग्राहक पंचायत मौदा तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे, उपाध्यक्ष दिगांबर बांगडकर, सचिव अजय मते, मार्गदर्शक डॉ. निलिमा घाटोळे, ईश्वर पत्रे, महेंद्र चकोले, कोषाध्यक्ष डॉ. सुनील बोरकर, पर्यावरण प्रमुख गुलाब तुरनकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य देवेंद्र सोनटक्के, प्रकाश कोरडे, निरांजन केळकर, गुलाब भोतमांगे, अजय शेंडे, विनोद आंबागडे, पुरुषोत्तम ढोबळे, रमेश ढोबळे, सुभाष वानखेडे, शिवराज खांदेकर, राहुल भुरे, रमेश ढोबळे, प्रवीण वाघ, फागो खंदाळे, लिलाधर निखाडे, डॉ. रेवाराम घाटोळे तसेच कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मौदा तालुका संघटनेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा पाढा वाचून जास्तीत जास्त नागरिकांनी अ. भा. ग्राहक पंचायत सोबत जुळण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे यांनी प्रास्ताविकेतून केले आहे. तसेच कृष्णा खेडीकर, तुकाराम लुटे यांनी ग्राहकांचे अधिकार पटवून दिले आहे. सूत्रसंचालन दिगांबर बांगडकर तर आभार प्रदर्शन ईश्वर पत्रे यांनी केले. दरम्यान मार्गदर्शिका डॉ. नीलिमा घाटेळे यांनी उपस्थिततांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या उत्सव साजरा केला.




