Home Breaking News सेवानिवृत्त पोलीसांतर्फे शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

सेवानिवृत्त पोलीसांतर्फे शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

105
0

वानाडोंगरी
सेवानिवृत्त पोलीस व केंद्रीय रिझर्व बलाचे पोलीस तसेच नव मानव कल्याण सेवा संस्थेचे पदाधिकारी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी भाऊ बहिणीचा रक्षाबंधनाचा पवित्र सण असल्याने शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी नागपूर येथे जाऊन कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी केंद्रीय रिझर्व पोलीस बल गटाचे श्री चंद्रशेखर पाटणकर, नव मानव कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश कनेरे तेथील वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर चिन्मय खोटेले व परिचारिका सौ मयुरी शुभम इंगळे,अश्विनी वाघमारे तसेच उपचारार्थ दाखल पेशंट व ज्येष्ठ नागरिक श्रीमती शेवंताबाई घवघवे वय 76 वर्ष राहणार डेगमा यांनी या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भाग घेतला.
यावेळी रक्षाबंधना निमित्त डॉक्टर व परिचारिका यांच्या कार्याला त्रिवार नमन करून त्यांच्या हाताने घडलेल्या सेवेचे अभिवादन करून रक्षाबंधन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here