Home सांस्कृतिक व सामाजिक संभाजी ब्रिगेड व ग्रामपंचायतच्या सहकार्याने तेलकामठीत शिवजयंती उत्साहात साजरी

संभाजी ब्रिगेड व ग्रामपंचायतच्या सहकार्याने तेलकामठीत शिवजयंती उत्साहात साजरी

74
0

गिरीश आंदे
दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता समाजभवन, तेलकामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व ग्रामपंचायत तेलकामठी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास गावातील नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत तेलकामठीच्या सरपंच प्रेमा डफरे, उपसरपंच ऊमराव भुजाडे तसेच ग्रामपंचायत सदस्य आनंदराव गायधने, मनीषा वाघ, मनीषा वाढीकर उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे कांचन ढवगाळे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
तसेच पोलीस पाटील बेबी घोळसे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण मोहोड, सुनील पगारे, हेमराज घोळसे, पुरुषोत्तम वाढीकर,भावेश वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा देत तरुणांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here